खापरी ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे निर्दोष मुक्त

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील खापरी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर आनंदराव काकडे यांची 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय ध्वज उलटा फडकावल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. घाटंजी येथील न्यायालय क्रंमाक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी हा निकाल दिला आहे. सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे यांच्या बाजूने यवतमाळचे प्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. राजेश साबळे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. त्यांना ॲड. अनंतकुमार पांडे यांनी सहकार्य केले. 

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.15 वाजता खापरी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्या नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आले की, राष्ट्रीय ध्वज उलटा फडकवण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी खापरी येथील राहुल खांडरे यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन आरोपी ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे विरुद्ध अपराध क्रंमाक 455/2019 अन्वये राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास करून घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने 12 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध न केल्याने सबळ पुराव्या अभावी शंकर काकडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here