अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पुरुषोत्तम ऊर्फ अमोल गजानन बनारे (रा. मनूर बु., ता. बोदवड) यास भुसावळ येथील विशेष न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी पुरुषोत्तम बनारे याने दि. 2 ऑगस्ट 2017 रोजी पीडितेवर अत्याचार केला होता. या घटने प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या घटनेला विरोध करणाऱ्या पीडितेच्या नातेवाइकाला मारहाण झाली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे पीड़ित बालिका, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बारकू जाने यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी पुरुषोत्तम यास सात वर्ष शिक्षा आणि सात हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे.

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अँड. संजय डी. सोनवणे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून शेख रफिक शेख कालू यांनी त्यांना मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here