मुंबई– देशभरातील IIT, IIM, NLU आणि इतर खाजगी विद्यापीठांमधून छात्र संसद इंटर्ननेशन लीडरशिप टूर 2025′ साठी निवडण्यात आलेल्या 35 विद्यार्थी प्रतिनिधींनी सोमवार दिनांक 05 जानेवारी 2025 रोजी शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे ह्यांची भेट घेतली.
आदित्य ठाकरे ह्यांनी त्यांच्यासह हवामान बदल, ग्रामीण व शहरी विकास, शिक्षण, राजकारणातील तरुणांसाठीच्या संधी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली. या विद्यार्थ्यां मध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता. याप्रसंगी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, छात्र संसदचे कुणाल ठाकूर, रतीन भट, आदित्य वेगडा उपस्थित होते.