जनतेच्या मदतीसाठी सज्ज असणारे रजनीकांत बोरेले

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील रजनीकांत डालूराम बोरेले हे एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.  मानवतावादी विचारसरणी, अध्यात्मिकता आणि समाजासाठीच्या समर्पण अशी त्यांची ओळख आहे. रजनीकांत बोरेले यांनी आपली जीवन यात्रा मानवकल्याण आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पित केली आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि योगदानासाठी त्यांना प्रतिष्ठेचा जिंदाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार म्हणजे जणू काही त्यांचे परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे.

रजनीकांत बोरेले हे आरटीआय कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर म्हणून समाजात परिचीत आहे. सत्य आणि पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य केले आहे. न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या लोकांसाठी त्यांचा आवाज म्हणजे जणू: काही एक आशेचा किरण आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण किंवा गरिब – गरजूंच्या मदतीसारख्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.

त्यांची आध्यात्मिकता आणि मानवतावाद त्यांना खऱ्या अर्थाने एक देवदूत ठरवतात. त्यांची प्रेरणादायी जीवनकथा त्यांच्या समकालीनांना नव्हे तर पुढच्या पिढ्यांनाही शिकवते की एक व्यक्ती आपल्या विचारसरणी आणि कृतींनी समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. निःस्वार्थ सेवा, धाडस आणि सत्याच्या प्रति अढळ राहून एक व्यक्ती समाजाला नवी दिशा देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here