ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर दगडफेक प्रकरणी गुन्हा

जळगाव : सुरत येथून प्रयागराजकडे निघालेल्या ताप्तीगंगा एक्सप्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावत केलेल्या नुकसानीप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव रेल्वे स्टेशन नजीक रविवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास हा दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत रेल्वेच्या एसी कोचची काच फुटून नुकसान झाले. या घटनेत कुणाला इजा झाली नसली तरी डब्यातील प्रवासी वर्गात भितीचे वातावरण पसरले होते.

या घटनेची माहिती भुसावळ स्थानक प्रमुखांना समजल्यानंतर बी 6 या कोचची फुटलेली काच बदलण्यात आली. घटनास्थळी जळगाव रेल्वे पोलिस दलाचे उप निरीक्षक मनोज सोनी यांनी भेट देत संबंधीतांना पुढील कारवाईच्या सुचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here