मराठा विद्याप्रसारक वाद प्रकरणी चौघांविरुद्ध संगठीत गुन्हेगारीचे कलम

On: January 29, 2025 8:03 AM

जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जावून मारहाण करण्यासह कागदपत्रांची चोरीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चौघांविरुद्ध संगठीत गुन्हेगारीच्या कलमाची वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतच्या सरकारपक्षाच्या वतीने कागदपत्रांची न्यायालयात पुर्तता करण्यात आली आहे.  

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अॅड. विजय भास्कर पाटील, त्यांचे भाऊ संजय भास्कर पाटील, अॅड. प्रवीण चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अॅड. विजय पाटील यांना जामीन मिळाला असून इतर तिघांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment