घाटंजी (यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली असुन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे.
सदर प्रकरणात सचिव सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग मुंबई, विभागीय सहनिंबधक सहकारी संस्था अमरावती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव कपिल चन्नावार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितिन अशोक कोठारी (भांबोरा) यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचीका दाखल करुन स्थगितीची मागणी केली आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणीत दोन संचालक अपात्र प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी दिला होता. याचिकाकर्ते संचालक अभिषेक ठाकरे व संचालक आशिष लोणकर यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, ॲड. यशोवर्धन सांबरे, ॲड. रोहन देव यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान, सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती मुकूलीका श्रीकांत जवळकर यांच्या एकलपीठाकडे होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी येथे कापसाच्या लिलावा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितिन अशोक कोठारी (भांबोरा) व माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांच्यात शेतकऱ्यांच्या कापसाच्या दरा वरुन वाद उपस्थित झाला होता.
या वेळी काही शेतकऱ्यांनी घटनेचे व्हिडिओ क्लिप सुद्धा काढले होते. सदर प्रकरणात घाटंजी पोलिस स्टेशनला तक्रारी सुद्धा करण्यात आल्या व घाटंजी पोलीसांनी चौकशी सुद्धा केली होती. त्यावेळी घाटंजी तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे रास्तारोको आंदोलन केले होते. मात्र, संबंधित व्यापाराने शेतकऱ्यांचे काही एक ऐकले नाही व कापसाचे दर सुद्धा वाढविले नाही, हे विशेष. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती नितिन अशोक कोठारी (भांबोरा), उपसभापती सचिन देशमुख पारवेकर (पारवा) विरुद्ध या पुर्वी दाखल केलेल्या याचिका प्रलंबित व सुरु आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचीकेचा क्रमांक WP/५०४८/२०२४ (APMC संचालक अभिषेक ठाकरे) व WP/५०५२/२०२४ (APMC संचालक आशिष लोणकर) असा आहे. याचीकाकर्ता यांनी अनुच्छेद २२६, २२७ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सदर प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितिन अशोक कोठारी व सचिव कपिल चन्नावार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ॲड. रंजीत सिंग गहीलोत यांच्या मार्फत कॅव्हेट दाखल केला होता. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी असुन याचीकातर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, ॲड. यशोवर्धन सांबरे, ॲड. रोहन देव हे काम पाहत आहे.