जळगाव – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे घडलेल्या विनयभंग व पोक्सो अंतर्गत दाखल खटल्यात राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून जळगावचे माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांची नियुक्ती केली आहे.
एका बड्या राजकीय नेत्याच्या कुटुंबातील लहान मुलीच्या संदर्भात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. राज्य शासनाने एक अधिसूचना काढून अँड. केतन ढाके यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलीआहे.
हा खटला भुसावळ येथील सत्र न्यायालयात चालणार आहे. या खटल्याकडे जळगाव जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.