घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च २०२५ रोजी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
घाटंजी येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन घाटंजी तालुका विधी सेवा समीतीचे अध्यक्ष, न्यायालय क्रंमाक १ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी न्यायालय क्रंमाक २ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ परिकाम्य लेख अधिनियम प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन प्रकरणे, एमएसईबी प्रकरणे, वाद दाखल पुर्व प्रकरणात टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित, राष्ट्रीय कृत बॅंक, पतसंस्था, ग्रामपंचायत, बँकेशी संबंधित प्रकरणे वाद दाखल पुर्व प्रकरणे आदीं राष्ट्रीय लोक अदालती समोर ठेवण्यात आलेली आहेत.
घाटंजी येथील राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन घाटंजी तालुका विधी सेवा समीतीचे अध्यक्ष, न्यायालय क्रंमाक १ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी केले आहे.