जलजीवन मिशनच्या योजना तातडीने पुर्ण करु – आ. प्रा. राजु तोडसाम

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : जलजीवन मिशनच्या योजना तातडीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आर्णी विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा,. राजु तोडसाम यांनी म्हटले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ आढावा सभा महालक्ष्मी लॉन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आ. प्रा. राजु तोडसाम बोलत होते. आर्णी तालुक्यामधील अति टंचाईग्रस्त गावांमध्ये  टँकरद्वारे पाणीपुरवठा  करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी या वेळी दिले.

या सभेला आर्णी तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, महसूल अधिकारी, आणि पंचायत समिती मधील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी, आर्णीचे तहसीलदार वाहुरवाघ, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर. आर. खरोडे, जल जीवन मिशन विभागाचे शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, यवतमाळ जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सविताताई जाधव, प्रकाश राठोड, भाजपाचे बिपिन राठोड, सरपंच रमेश चव्हाण (केळझरा), सरपंच रवी राठोड (किन्ही), अमित ठाकरे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडे यांच्या सह तालुक्यामधील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज कनेक्शनच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी  वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता राऊत यांना विज कनेक्शन देण्याबाबत आमदार तोडसाम यांनी यावेळी सूचना दिल्या. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये विहीर अधिग्रहण करणे, विहिरीचे खोलीकरण करणे, त्यामध्ये आडवे – उभे बोर करणे, हातपंप, इंधन विहीर घेणे,  जलजीवन योजनेअंतर्गत अपूर्ण असलेल्या योजना तात्काळ पूर्ण करणे, यासह  पाणीटंचाई निवारण करण्यासाठी अनेक उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. या वेळी ग्रामपंचायत सरपंच, लोकप्रतिनिधी पाणीटंचाई सोडवण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित केल्याबद्दल लोकप्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आर्णी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी गोविंद इंगोले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here