प्राणघातक हल्ल्याप्रकरणी राहुल वाघदरे दोषी  

घाटंजी – यवतमाळ  (अयनुद्दीन सोलंकी) – तलावफैल येथील आरोपी राहुल वाघदरे (वय १८, रा. तलावफैल) हा दोषी आढळल्याने विशेष न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांनी चार वर्षे १ महीन्याची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली. 

५ मार्च २०२१ रोजी फिर्यादी छत्रपती सिडामची आई व वहीणी घराच्या अंगणात बसले होते. आरोपी राहुल वाघदरे हा तेथेच कंपाऊंड जवळ लघवी करत होता. या वेळी आरोपीला छत्रपतीच्या आईने हटकले. यात फिर्यादी छत्रपती सिडाम आणि राहुल वाघदरे व सचिन वाघदरे यांच्यात हाणामारी होउन चाकुने हल्ला करण्यात आला. फिर्यादी छत्रपती सिडाम यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी भादंवि कलम ३०७, ५०६, ३२५ व सह कलम ३४ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३ (२) (v) अंतर्गत गुन्हा नोंदवला. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

सदर प्रकरणात फिर्यादी, साक्षीदार व परिस्थीती पुरावे ग्राहय धरुन गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी राहुल वाघदरे यांस ४ वर्ष १ महीन्याची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांनी ठोठावला आहे. आरोपी सचिन वाघदरे याचा मृत्यू झाल्याने प्रकरण बंद करण्यात आले. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. मंगेश गंगलवार यांनी न्यायालयात मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here