घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाटीपुरा समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ६ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान भीम जयंतीचा पंधरवाडा साजरा केल्या जात आहे. त्याची सुरुवात म्हणून आज ६ एप्रिल रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये भदंत राहुल यांनी धम्म ध्वज दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. परिसरातील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
ब्लू स्टार ग्रुप सॉफ्टबॉल, यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी पाटीपुरा परिसरातील विविध भागात पथनाट्य सादर करून नशामुक्ती, दारूबंदी तसेच उच्च शिक्षण घेण्याचा संदेश दिला व बाबासाहेबांच्या विचारातील जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. सदर रॅलीचे संयोजन अभियंता संदीप गायकवाड, ज्योतीताई खोब्रागडे, शालिनीताई घायवान, पल्लवीताई रामटेके यांनी केले.
सकाळी १० ते दुपारी २ च्या दरम्यान भव्य रोगनिदान शिबिरामध्ये यवतमाळातील नामवंत तज्ञ डॉ. अरुण जनबंधू, डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ. श्रीकांत पठाडे, डॉ. विजय मून, डॉ. अनिल उमरे, डॉ. गोवर्धन वानखडे, डॉ. रजनीकांत निथाळ , डॉ. आतिश गजभिये, डॉ. सुशील वानखडे, डॉ. निलेश उके, डॉ. प्रतीक वानखडे, डॉ. दीक्षा वनकर, डॉ. स्नेहल कांबळे, डॉ. प्रफुल सूर्यकार तसेच इतर डॉक्टरांनी आपली सेवा दिली. रोगनिदान शिबिरासाठी अभियंता माणिक मोटघरे, शिवप्रसाद राऊत यांनी संयोजन केले. सदर रोगनिदान शिबिरामध्ये ३०० रुग्णांनी मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला.
सदर उपक्रमासाठी जयंती मंडळाच्या वतीने तिलोत्तमा बेले, रविता भोवते, उज्वला चंदनखेडे, वैशाली पाटील, बालीताई मेंढे, कविता नागदिवे, पुष्पाताई राऊत, शीलाताई मेश्राम, मनीषा हुमणे, अनिता भांगे, ज्योती तामगाडगे, इंद्रायणी गायकवाड, भिमटे ताई, स्नेहल पाटील, मृणालिनी दहीकर, माधुरी ढेपे, कांचन दुपारे, कल्याणी भोंगाडे, पद्माकर घायवान, अशोक भोवते, प्रशांत पाझारे, योगेश बोरकर, पियुष चहांदे, पियुष रामटेके, प्रथमेश साखरे, सम्यक शेलारे, अँड. सनी उके, भाकीत मेश्राम, मिलिंद मेश्राम, सुरज पाटील, अक्षय खोब्रागडे, स्वप्निल थूल , प्रीतम थूल, रोशन पाटील, जयूष पाटील, विशालकुमार राऊत, सचिन मेश्राम, कुणाल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. सचिव आशुतोष वासनिक, कोषाध्यक्ष प्रकाश नरगडे, अध्यक्ष ॲड. राहुल पाटिल यांनी सर्वांचे आभार मानले.