घाटंजी न्यायालयात न्यायधीश पी. आर. पाटील व न्यायधीश आर. बी. सुर्यवंशी रुजू होणार

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – यवतमाळ जिल्ह्यातील न्यायधिशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार समीर एस. अदकार यांच्या आदेशाने शनिवारी या बदल्या करण्यात आल्या.  घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांची बदली सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाली आहे. दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांची बदली गंगापूर (औरंगाबाद) येथे करण्यात आली आहे. केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांची वसई (ठाणे) येथे बदली करण्यात आली आहे. यवतमाळ येथील एस. एस. मतकर यांची बदली यवतमाळ येथून को ऑपरेटिव्ह कोर्ट मुंबई येथे करण्यात आली आहे.

पी. सी. बारटक्के यांची बदली बाभुळगांव येथून इंदापूर (पुणे) येथे करण्यात आली आहे. ए. ए. पुंड यांची बदली दारव्हा येथून को ऑपरेटिव्ह कोर्ट कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. व्ही. एस. शिंदे यांची बदली नेर वरुन कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. एस. एम. कोळेकर यांची बदली महागांव वरुन धर्माबाद (नांदेड) येथे करण्यात आली आहे.

ए. एम. विभुते कळंब वरुन वडगांव (पुणे), बी. एस. जगदळ दिग्रस वरुन पुणे, डी. जी. मस्के पुसद वरुन खेड (रत्नागिरी), एन. आर. ढोके दिग्रस वरुन पैठण (औरंगाबाद), जी. एस. वरपे पुसद वरुन मुरबाड (ठाणे), एस. के. शेख वणी वरुन श्रीवर्धन (रायगड अलीबाग), व्ही. बी. चव्हाण पुसद वरुन कलवान (नाशिक), ए. एस. शेख उमरखेड वरुन कल्लाम (उस्मानाबाद), एस. झेड. ए.  एस. झेड. ए. कादरी पुसद वरुन हिमायतनगर (नांदेड), डी. आर. कुळकर्णी राळेगांव वरुन शेवगांव (अहमदनगर), ए. एन. निवडंगे उमरखेड वरुन परांडा (उस्मानाबाद), के. एस. वानखेडे केळापूर वरुन धर्मदाय आयुक्त चंद्रपूर, एस. जी. जाधव पुसद वरुन हदगांव (नांदेड) आदीं ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश १ हेमंत एस. सातभाई यांची बदली केळापूर वरुन वसई (ठाणे) येथे करण्यात आली आहे. पुसद येथील एन. एच. मखरे यांची बदली लातूर येथे करण्यात आली आहे. ए. बी. भस्मे दारव्हा वरुन अंबाजोगाई, ए. एम. भंडारवार यवतमाळ वरुन मुंबई, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लउळकर यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. श्रीमती एस. जी. शेख दारव्हा वरुन नागपूर, आर. एस. साळगांवकर यवतमाळ वरुन नागपूर, एस. आर. कफरे यवतमाळ वरुन ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here