घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ७ लाख १९ हजार ८८० महिलांनी अर्ज दाखल केला होता. पैकी ६ लाख ९२ हजार ५६३ महीला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून लाभार्थ्यांना आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले. मात्र, या खात्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड जोडल्यामुळे अनेक श्रीमंत लाभार्थी अपात्र झाले आहे.
ज्या महिलांकडे शेती, घर, चारचाकी वाहन, दुचाकी वाहन, व्यवसाय करत असलेल्या महिला, काही महिला स्वतः नौकरीवर आहे अशा महिला विरुद्ध शासनामार्फत कारवाई सुरू आहे. तर अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ नको म्हणून स्वत:हुन महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करुन सदरचा लाभ नको आहे, म्हणून विनंती करत असल्याचे दिसत आहे. सद्यातरी यवतमाळ जिल्ह्यात एकूण २७ हजार ३१३ महिला अपात्र झाल्या असुन ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या महिला पात्र नाही अशा महिलांकडून १३,५०० रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते.