घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार (Notification no. 3902/2025, Dt. 5/4/2025) यवतमाळ जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदल्या विविध न्यायालयात करण्यात आल्या आहे. यवतमाळ येथील सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. जे. डऊले यांची बदली ५ वे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय बारामती (जिल्हा पुणे) येथे करण्यात आली आहे.
यवतमाळचे सह दिवाणी न्यायाधीश बी. एस. संकपाळ यांची बदली रत्नागिरी येथे करण्यात आली आहे. पुसद येथील सह दिवाणी न्यायाधीश एन. सी. बोरफलकर यांची बदली सोलापूर येथे करण्यात आली आहे. अंबेजोगाईचे सह दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी झेड. झेड. खान यांची बदली यवतमाळ येथे करण्यात आली आहे. यवतमाळचे २ रे सह दिवाणी न्यायाधीश ई. व्ही. धांडे यांची बदली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यवतमाळ न्यायालयात करण्यात आली आहे. बीड येथील सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी टि. ए. आसरकर यांची बदली सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यवतमाळ न्यायालयात करण्यात आली आहे.
यवतमाळचे ४ थे सह दिवाणी न्यायाधीश व JMFC एम. डी. जोशी यांची बदली यवतमाळ न्यायालयात करण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती सी. आर. उमरेडकर, आर. आय. सोनवने, एस. एम. जोशी, श्रीमती एस. एस. मतकर, एम. एस. पौळ, एम. जे. एम. जे. शेख, ए. एम. बगे आदींची यवतमाळ न्यायालयात बदली करण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश डी. पी. म्हस्के, एस. जी. जाधव, जी. एस. वरपे व व्ही. बी. चव्हाण, कादरी एस. झेड. ए. एस. ए. यांची बदली पुसद न्यायालयात करण्यात आली आहे. तर सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. पुंड, एस. व्ही. राजकुंटवार यांची बदली दारव्हा न्यायालयात करण्यात आली आहे. सदरच्या बदल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अधिसूचनेनुसार ५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले आहे.