घाटंजी तहसील कार्यालयात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

On: May 2, 2025 11:43 AM

यवतमाळ (घाटंजी) अयनुद्दीन सोलंकी :घाटंजी येथील तहसील कार्यालयात गुरुवारी सन २०२५ – २०३० करिता सरपंच पदाचे व महिला सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. या वेळी केळापूर (पांढरकवडा) येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय महसूल अधिकारी उपस्थित होते.

या वेळी केळापूर (पांढरकवडा) येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय महसूल अधिकारी व नियंत्रण अधिकारी अमीत रंजन, घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे, घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार विरेंद्र सोळंके, साखरा येथील मंडळ अधिकारी रविंद्र शिंदे व निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक संदीप इंगोले आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती (SC) – पंगडी – महिला, हिवरधरा, आमडी, भांबोरा – महिला

अनुसूचित जमाती (ST) – सगदा – महिला, बेलोरा, मारेगांव, कवठा (खु.) – महिला, कुर्ली – महिला, पार्डी (नस्करी) – महिला, शिरोली, ठाणेगांव, ताडसावळी, डोर्ली – महिला, शरद – महिला, रामपूर – महिला, माणुसधरी, कोपरी (खुर्द), पारवा, वाढोणा (खु.), राजूरवाडी – महिला, कोळी (बु.) – महिला, राहटी – महिला, पार्डी (जांब), चिखलवर्धा – महिला, जांब – महिला, घोटी, सायफळ, कोळी (खु.) – महिला, उंदरणी, झटाळा, टिटवी – महिला, बोदडी, कोपरी कापसी – महिला

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – पाटापांगरा – महिला, ससाणी – महिला, सावरगांव, सायतखर्डा – महिला, पिंपरी

सर्व साधारण (OPEN) – तिवसाळा, खापरी, सावंगी संगम, जरुर, इंझाळा, डांगरगांव, कुंभारी, साखरा (खुर्द), देवधरी, वघारा टाकळी, किन्ही, मोवाडा, शिवणी, दहेगांव, जरंग

सर्व साधारण महिला (OPEN LADIES) – चोरंबा, मांजरी, येरंडगांव, मुरली, पांढुर्णा (बु.), मानोली, चांदापूर, अंजी (नृसिंह), वासरी, तरोडा, कु-हाड, राजापेठ, पांढुर्णा (खु.), कोची, मांडवा, आंबेझरी

घाटंजी तहसील कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत काढण्याच्या वेळी घाटंजी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आजी – माजी पदाधिकारी आदीं उपस्थित होते. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment