नुकतीच आणीबाणीची चर्चा झाली राकॉ नेते शरदराव पवार यांनी सध्या देशात अन राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचे म्हटले. पण खानदेशचे लाडके नेते माजी भाजपा मंत्री आणि सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषद सदस्य आमदार असलेले एकनाथराव खडसे यांनी इधर भी हम उधर भी हम अशी दोन डगरीवर पाय ठेवणारी भूमिका घेतल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे. हे खडसे साहेब खरच ग्रेट. जनतेचा एक वर्ग त्यांचा चाहता – लाडका. आपले साहेब मंत्रिमंडळात कधीतरी येतील, मुख्यमंत्री होतील अशी आशा बाळगून होता.

सन 2014 च्या सुमारास त्यांनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा जाहीर केली. तेव्हापासून त्या पदावर सीएम बसलेले देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे बिनसले. फडणविसांनी खडसे यांचे स्पर्धक गिरीश महाजन यांना झुकते माप देत खडसे यांचा पत्ता साफ केला पण मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात त्यांना भाजपात असताना बारा खाती सोपवली. आपणच 40 वर्षात भाजप वाढवला असे म्हणणाऱ्या खडसे साहेबांनी या काळात बारा हातांनी सात पिढ्यांना पुरुन उरेल एवढी माया संपत्ती कमावल्याचा त्यांच्यावर आरोप झाला.

या आरोपातून त्यांची अँटिकरप्शन नाशिकने चौकशी केली. ते मंत्री असताना तीस कोटीच्या प्रकरणात त्यांचा माणूस मंत्रालयात सौदेबाजी करताना की केल्यावर पकडला गेला. जो पकडला गेला त्याने मी पैसे घेतले का असा प्रश्न उपस्थित केला. त्याला पकडल्यानंतर वकिलांची फौज मंत्रालयात धाडण्यात आल्याचे समजले. एकंदरीत खडसे साहेब हे व्यक्तिमत्व केंद्रीय भाजपाला हार्ड रॉक (कठीण खडक) म्हणून पटवण्यात आले. त्यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी (ना. महाजन, ना. गुलाबराव, ना. अनिल पाटील) ब्लॅकमेलर म्हणून डीपीडीसीत ठरावही केल्याचे कळते. यानंतर त्यांच्यावर गौण खनिज प्रकरणात 400 कोटीचा आरोप झाला. परंतु जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी भीतीमुळे माहिती दिली नाही. टोलवाटोलवी केल्याचे सांगितले जाते.
अलीकडे म्हणजे 2024 मध्ये खडसे साहेबांची स्नुषा श्रीमती रक्षा खडसे या रावेरच्या खासदार म्हणून जिंकल्यावर केंद्र सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री आहेत. भाजपाचा उमेदवार कसाही असला तरी मोदीजींकडे पाहून मतदान करा असे आवाहन त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत करण्यात आले होते असे कळते. आता कसाही चा काय अर्थ घ्यावा कर्तुत्व शून्य की कर्तबगार मोदीजींकडे पाहून मतदान करायचे तर तुम्ही उभ्या का राहता असे प्रश्न चर्चेत असल्याचे कळते. आता प्रश्न नाथाभाऊंचा. ते सध्या राकॉत पण म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही आहेत. त्यांची ही दुहेरी भूमिका एका वृत्तपत्राने छापली. आता राष्ट्र संघ प्रमुख मोहनजी भागवत अधिकृतपणे यावर खुलासा करतील काय? आणीबाणी – 1 ही 1975 ची. हे निवडून आले 1990 च्या दशकात. 1975 ते 1985 हा ना. मधुकरराव चौधरी, ना. प्रतिभाताईंचा बोलबाला असणारा कालखंड सांगितला जातो. तेव्हा आरएसएसने रा कॉ त काँग्रेसमध्ये जनसंघासह भाजपात काम करण्याची त्यांच्या सर्व सेवकांना परवानगी दिली काय? केवळ “नमस्ते सदा वत्सले” पाठ करुन ठेवल्याने कोणी संघाचे होते काय?