घाटंजी – यवतमाळ : घाटंजी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या संशयितांचा जामीन अर्ज यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायधीश एस. यु. बघेले यांनी अटी शर्थीवर मंजूर केला आहे. पराग नारनवरे असे जामीन मंजूर झालेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयित आरोपीने तपासकामी सहकार्य करावे, पुराव्या सोबत छेडछाड करु नये यासह पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. हर्षवर्धन देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली. या घटनेप्रकरणी घाटंजी पोलिस स्टेशनला अपराध क्रंमाक ३८४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७८ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ४, १२ (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. घाटंजी पोलीस पुढील तपास करत आहेत.







