घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी येथे महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तत्पर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आर्णी – केळापूरचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे आयोजन संत मारोती महाराज संस्कृतीक भवन, मानोली रोड, घाटंजी येथे दि २५ जुलै २०२५ रोजी सकाळी १ वाजता असून सदर शिबीर यशस्वी करण्याच्या अनुषंगाने सर्व संबधीत विभागांनी आपल्या विभागाशी संबधीत योजने बाबतची माहिती व देण्यात येणाऱ्या लाभाबाबतची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्यात यावे, याबाबत तहसीलदार विजय साळवे यांच्या कडून कळवण्यात आले आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, आशासेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल यांनी संयुक्तपणे शिबीरामध्ये लाभार्थी यांना मोठ्या संख्येने उपस्थीत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकिय योजना पोहोचविण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोतवाल यांचे मार्फत घरोघरी हर घर दस्तक अभियान राबविण्यात यावे, अशी माहिती तहसीलदार विजय साळवे यांनी संबंधित सर्व विभागाला दिले आहे.








