ॲड. उज्ज्वल निकम यांचा नागरी सत्कार

On: July 28, 2025 10:29 AM

जळगाव :  सन 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईत गेलो. याशिवाय इतरही खटले मी लढले, मात्र माझी जळगावसोबत असलेली नाळ कायम आहे आणि ती यापुढेही कायम राहील असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर जळगावला 27 रोजी त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी सन्माला उत्तर देतांना ते बोलत होते. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी या नागरी सोहळा समितीचे अध्यक्षपद भुषवले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात उत्स्फुर्तपणे पार पडला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु प्रा.डॉ.एन. के. ठाकरे यांच्या हस्ते अ‍ॅड. उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारार्थी खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह त्यांच्या पत्नी ज्योती निकम, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, पणन व राज शिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ व सर्व आमदार, पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल, मनपा आयुक्त चंद्रकांत ढेरे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुती हार, शाल, मानपत्र, स्मृतिशिल्प देऊन त्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. जळगावकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊनही त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांनी विद्यापीठ स्थापनेच्या अॅड. निकम यांनी केलेल्या योगदानाची यावेळी बोलतांना आठवण करून दिली. अॅड. उज्ज्वल निकम यांनी माझ्यासाठी एक फोन केला व 2014 मध्ये आपणास राज्यमंत्रिपद मिळाल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. अॅड. उज्ज्वल निकम यांच्या योगदानाचा मंत्री गिरीष महाजन यांनी उल्लेख केला. हा सन्मान ऊर्जा देणारा असल्याचे अॅड. उज्वल निकम यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हटले. हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण जळगावकरांचा सन्मान असल्याचे देखील ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment