स्थानिक स्वराज्य संस्था केवळ राजकीय संस्था नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

On: July 29, 2025 12:34 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ विभागातील भाजप पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा मेळावा 28 जुलै रोजी वर्धा येथे संपन्न झाला. स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून या नियोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री ‘देवा भाऊंच्या’ प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे भाजपा कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या केवळ राजकीय संस्था नसून, विकासाच्या योजनांना गती देणाऱ्या यंत्रणा आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पुन्हा एकदा स्थानिक स्तरावर मजबूत करून ‘घरोघरी विकास, मनामनात विश्वास’ या संकल्पनेतून कार्यकर्त्यांनी संघटीत काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment