विनयभंगाच्या आरोपातील शिक्षकास जामीन

On: July 31, 2025 11:53 AM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील संशयित शिक्षकाचा अटकपुर्व जामीन अटी शर्थीसह पंधरा हजाराच्या जात मुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी हा जामीन मंजूर केला.

घाटंजी तालुक्यातील अंजी (नाईक) येथील संशयित शिक्षक वसंत पत्रे यांच्याविरुद्ध घाटंजी पोलीस स्टेशनला गु.र.न. ५८३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ७५ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ व १२ पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. 

दर रविवारी घाटंजी पोलीस स्टेशनला हजेरी देणे, प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष साक्षीदारांवर दबाव आणू नये, पोलीसांना तपासात सहकार्य करावे आदी अटी शर्थीवर हा जामीन मंजुर करण्यात आला आहे. संशयीताच्या वतीने ॲड. ए. व्ही. चिरडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. 

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी खालील अटीवर व शर्तीवर अटक पुर्व जामीन मंजूर केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment