जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत उघडकीस आला आहे. धरणगाव पोलिस स्टेशनला यापुर्वी असलेले व आता पवारवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकाने मोटार सायकल चोरीचे विविध पोलिस स्टेशनला दाखल एकुण तिस गुन्हे उघडकीस आणले आहेत. या विविध गुन्ह्यातील मोटार सायकल चोरट्यांकडून धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे.
मालेगाव येथील शहेजाद सैय्यद एकबाल, शेख युसुफ शेख अयुब, शेख नाजीम अब्दुल हमीद, प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भुषण व देवीदास नानाजी वाघ यांच्या कब्जातून या तिस मोटार सायकलीव एक ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील दोन मोटार सायकली देखील अटकेतील चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. पवारवाडी पोलिस स्टेशनचे पो.नि. राहुल खताळ यांच्या पथकातील स.पो.नि. किरण पाटील, हे.कॉ. राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.







