जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा

On: August 20, 2025 9:40 AM

जळगाव, दि. १९, प्रतिनिधी: जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनमधील कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व छायाचित्रकारांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्यात. 

जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास छायाचित्रकार राजेंद्र माळी, हिमांशू पटेल, योगेश संधानशिवे, जगदिश चावला, जितेंद्र झंवर, अनिल नाईक, सुनील दांडगे, महेश दांडगे, परेश बाविस्कर, प्रशांत शिंदे, आनंद पाटील, संजय तिवारी, ज्ञानेश्वर शेंडे   आदी उपस्थित होते.  

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment