आ. प्रा. राजू तोडसाम यांचा सत्कार

On: August 21, 2025 10:02 AM

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : एम.आय.टी. स्कुल ऑफ गव्हर्नन्स व नेशन्स लेजिस्लेचर कॉन्फरन्स यांच्या सयुक्त विद्यमाने अमेरिकेतील बोस्टन येथे जागतिक आमदार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सहभागी होऊन परतलेले भाजपाचे आ. प्रा. राजु तोडसाम यांचा घाटंजी तालुका व शहर भाजपच्या वतीने स्वागत सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे घाटंजी तालुका अध्यक्ष विजय बैस, विशेष अतिथी शहर अध्यक्ष गजानन ढवळे यांच्यासह यवतमाळ जिल्हा सचिव सुरेश डहाके, अल्पसंख्याक आघाडीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मेहबूब मस्तान, जिल्हा संयोजक पदवीधर प्रकोष्ट संदीप माटे, महीला आघाडी जिल्हा संघटन मंत्री रीना धनरे, सरचिटणीस पंकज ठाकरे,  घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम खांडरे, ओबीसी आघाडीचे घाटंजी तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर डंभारे, बाळू जाधव  (घाटंजी तालुका अध्यक्ष भटक्या जाती जमाती), कृ. उ. बा. समिती घाटंजी संचालक चंद्रकांत इंगळे पाटील. संजय गोडे, चंद्रप्रकाश खरतडे, अल्पसंख्यांक आघाडी घाटंजी तालुका अध्यक्ष मज्जु पटेल, शहर महिला आघाडीच्या साधना माडूरवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश जाधव, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष गोपाल निलावार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात मोहन जाधव (माजी  जिल्हा अध्यक्ष वि ज भ ज आघाडी), प्रा. भगवान डोहळे, प्रभाकर चटुले,  वामन राठोड, पुंडलीक वाढई, किशोर डंभारे, किरण राठोड, विशाल कदम, प्रशांत नित, बंडू तोडसाम, ईशान गुप्ते या सह घाटंजी शहरातील भाजपा पदाधिकारी, युवक, महिला, भाजपा कार्यकर्ते आदीं प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक भाजपाचे जिल्हा सचिव सुरेश डहाके यांनी केले. तर अध्यक्षीय भाषण भाजपाचे घाटंजी तालुका अध्यक्ष विजय बैस यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत उगले यांनी केले. तर आभार प्रभाकर कानतोडे यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment