बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

legal

मलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे यास मलकापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याच्याविरोधात नांदुरा पोलिसांनी विविध कलमांन्वये अत्याचाराचा गुन्हा नोंद केला होता. आरोपीला अटक केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासले गेले. पिडीतेसह तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.

सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे यास १० वर्षांची शिक्षा व ५००० रु. दंड, दंड न भरल्यास १ महिना कारावास, तसेच कलम ३७६ (अ) नुसार ७ वर्ष सक्तमजुरी, ५००० रुपए दंड, कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सक्तमजुरीसह विविध शिक्षा ठोठवण्यात आल्या आहेत. दंडाची रक्कम पिडितेला देण्याचा आदेश देखील न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश जोशी, व्ही.एम.बापट यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here