रा.कॉ.त इनकमिंग जोमात

On: September 16, 2020 12:41 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज सहकार क्षेत्रातील एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

सहकार क्षेत्रातील आघाडीचे नेते सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हजेरीत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष देखील आहेत.

मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्क प्रमुख डॉ. ओमकार माळी तसेच उद्योजक पंकज सिन्हा यांनी काही दिवसांपुर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रा.कॉ. पक्षात प्रवेश केला होता.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा रा.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील आदी हजर होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment