आमदार निवासात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

On: September 16, 2020 8:05 PM

मुंबई : आमदार निवासात एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस पथक दाखल झाले. गजानन खैरे नावाच्या शिक्षकाने वेतन मिळत नसल्याच्या कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत दाखल झाले. नाना पटोले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शिक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आताच अध्यादेश काढण्याची शिक्षकाची अट आहे.

शिक्षक गजानन खैरे मुळचे औरंगाबाद येथील आहेत. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी त्यांनी नाशिक ते विधानभवन मुंबई पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र त्यावेळी त्यांना मध्येच अडवण्यात आले होते. याचाच पाठपुरावा करण्यासाठी काही दिवसांपासून ते आमदार निवासात होते आणि अखेर आज त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment