कुख्यात गुन्हेगार समीर काकर येरवडा जेलमधे स्थानबद्ध

On: September 26, 2025 8:01 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील कुख्यात गुन्हेगार समीर हनीफ काकर यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह चोरी घरफोडीचे एकुण तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या समाजविघातक कृत्यामुळे सामाजिक नुकसान सुरु होते.

हद्दपारीनंतर देखील त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो फरार झाला होता. तो पुणे येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक, चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.काँ विशाल कोळी, गणेश ठाकरे योगेश घुगे आदींच्या पथकाने त्याचा पुणे येथे शोध त्याला ताब्यात घेतले. त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment