जळगाव – श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त जळगाव शहरातील तेली समाज बंधू भगिनींनी आज मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. सदर रॅली जळगाव शहरातील तरुण कुढापा मंडळापासून सुरू झाली. पांढरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक, कालिका माता मंदिर, संताजी जगनाडे महाराज मंदिर असा या रॅलीचा मार्ग होता.
या प्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांचा जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला महानगराध्यक्ष सौ. मनीषा प्रदीप चौधरी, प्रशांत सुरडकर, निर्मला चौधरी, विनोद चौधरी, शोभाताई चौधरी तसेच शहरातील शेकडो बंधू-भगिनी उपस्थित होत्या.







