जळगाव : ग्रामसेवकाच्या सहीचा नमुना आठचा उतारा आणून दिल्याच्या बदल्यात तिन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हाकाकोडा येथील सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एसीबीच्या महिला पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हाकाकोडा येथील रहिवासी आहेत. ग्रामपंचायतीची बखळ जागा स्वत:च्या नावे करुन त्यावर शासनाच्या घरकुल योजनेत त्यांना घर बांधायचे होते. त्याकामी तक्रारदार हे सरपंचांना भेटले होते. ऑक्टोबर 2024 मधे सरपंच कांबळे यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने त्यांना ग्रामसेवकाच्या सहीचा नमुना आठचा उतारा आणून दिला. त्या उता-याच्या मोबदल्यात त्यांना सरपंचाकडून तिन हजाराची मागणी करण्यात आली होती. एसीबीच्या पडताळणीत लाच मागणी केल्याचे साठी निष्पन्न झाले.
पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या पथकातील सापळा अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे यांच्यासह पीएसआय दिनेशसिंग पाटील, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.



