महिलांचा वाद, 25 लाखाची सुपारी आणी कुरघोडीचे राजकारण

On: April 12, 2026 7:51 PM

पुणे शहरात 25 लाखांची सुपारी वाजवणाऱ्या चौघा जणांवर कारवाई करणार की त्यांना वाचवणार या सह दोन महिला पदाधिका-यांमधे जुपंलेल्या वादात फोडणी दिली दिली ती कुरघोडीच्या राजकारणाने. काहीच आठवड्यापूर्वी महिला आयोग अध्यक्षा, राकाँ महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा झाला. त्यानंतर त्यांना आता त्यांच्याच पक्षाच्या दुस-या रुपालीताई पाटील (ठोंबरे) भिडल्या. या रुपालीताई ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या बदनाम करण्यासाठी अलिकडेच 25 लाखांची सुपारी देण्यात आली आणि ती वाजवणा-यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत जोरदार धमाल केली. त्यात एका बहाद्दराने कुणातरी वारांगना किंवा सोप्या बोली भाषेत देहविक्रय करणाऱ्या महिलेकडून बेदम मार खाल्ल्याचा किस्स्सा सांगितला.

शिवाय ज्याची ही धुलाई झाली त्याचा नामोच्चार सोशल मिडीयावर मुलाखत देतांना केला. पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघानेही पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणाची चौकशी करा आणि प्रकरण दाबून टाकून गुन्हेगारीस प्रोत्साहन देणाऱ्यानांही उघ‌डे पाडा अशी मागणी एका निवेदनाद्वारे केल्याचे कळते. ही नवीन वादावादी सुरु होण्यापूर्वी गेल्या महिन्यात नाशकात कुण्या अशोक खरात बाबाने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण, आर्थिक उलाढाली, दोन पतपेढ्या, कांदा घोटाळा, कोटींचा घोटाळा, 1300 कोटी, 2 हजार कोटी, जमीन हडपणे अशी सुमारे दहा-पंधरा हजार कोटींची प्रकरणे गाजली. दारणा धरणातील पाईप लाईन, पाणी चोरी ही गाजली.

भोईबाबांचा प्रसाद, ओशनो जल, त्यामुळे गाजलेल्या प्रशासनातल्या कथित बदल्या – बढत्या गाजल्या. भोदू बाबांसोबत आजी-माजी मुख्यमंत्री, अनेक मंत्री, चाळीस आमदारांची चर्चाही गाजली. खरात बाबाची सर्व भानगड आपणच बाहेर काढली असा युक्तीवाद मुख्यमंत्र्यासह आणखी एका मंत्र्याने चालवला आहे. तत्पूर्वी पुणे जिल्ह‌यातील दोन रुपालीताईंमध्ये 25 लाखाच्या सुपारी वाजवण्याची ठिणगी पडल्याने आधीच भ्रष्टाचाराच्या आगीत तेल ओतले गेले. यातून वादग्रस्त, कळपग्रस्त, अनेक शिक्के बसलेल्या पत्र‌कारितेचा काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे एक काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे.

वास्तविक अनेक पत्रकार‌ बांधव इमाने इतबारे जीव धोक्यात घालून चांगले काम करत असतांना केवळ दोन ते दहा वीस टक्के लोक पत्रकारिता बदनाम करत आहेत. यावरुन एक जुना किस्सा सांगावासा वाटतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे स्व. भाई मदाने तेव्हा एका भाषणात म्हणाले होते की आम्ही वृतपत्रांचे मालक वार्ताहरांना तुटपुंजे मानधन देतो. परंतु आपली बातमी चांगली छापून यावी यासाठी पत्रकाराला कुणी पोटभर जेवण दिल्यास  आम्हीच त्याला पार्टी झाली का? असा जाब विचारतो हे चित्र राज्यभर आहे. दुसऱ्या एक विद्वान महिला पत्रकार राही भिडे. त्या विचारवंत. त्यांनीही क्षेत्र गाजवले. परंतु नोकरी सोडल्यावर म्हणा की त्या सेवा क्षेत्रात असतांना म्हणाल्या की आता तर पत्रकारितेचा चेहरा बदलला आहे. पत्रकारांच्या हाती काही राहिले नाही. आता मालकवर्गच कथित डील करू लागलाय. तुम्ही काही छापण्यापूर्वी भानगडीची बातमी समोर ठेवा, तुम्ही काही करू नका. आम्ही तुम्हाला वेतन देतो. आम्हीच काय ती डील करु.

आता भिडे ताईंना कुणी जाब विचारल्यास त्या इन्कारास मोकळ्या आहेत. एक जुने दिवंगत मोठे पत्रकार म्हणाले होते की अहो आमच्या वृत्तपत्राचा पत्रकारच नव्हे तर शिपाई सुद्धा विकला गेला आहे. वृत्तपत्रांच्या मालकांच्या मुलाशी तर कधी त्यांच्याशी हस्तांदोलन किंवा हातमिळवणी करतांनाचे फोटो पहिल्या पानावर येत आहेत. अर्थात कुणी कुणाला भेटावे, हस्तांदोलन करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता पुण्याचे पोलिस आयुक्त त्यांच्याकडे आलेल्या कथित निवेदनावर, कुणावर कुणावर काय कारवाई करणार त्याची प्रतिक्षा. आम्हास कोळसा जास्त उगळायचा नाही बरे! कितीही उगाळला तरी तो पांढरा व्हायचा नाही. शो मस्ट गो ऑन. चुकभूल क्षमस्व.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment