नाथाभाऊ खडसे यांची राजकीय चर्चा रंगली

On: September 23, 2020 5:59 PM

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आज जोरदार उधान आले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत रा.कॉ.च्या उत्तर महाराष्ट्रातील काही स्थानिक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत एकनाथराव खडसेंच्या रा.कॉ. प्रवेशाबाबत माहिती जाणून घेण्यात आल्याच्या बातम्या बाहेर आल्या.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील आदींची हजेरी होती. या बैठकीत भाजपचे प्रभावशाली नेते एकनाथराव खडसेंच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली असली तरी बाहेर या बाबत कुणी स्पष्ट बोलण्यास तयार नसून चुप्पी साधली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment