कंगना ड्रग्स घेत असेल तर तिचीदेखील चौकशी व्हावी : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

On: September 23, 2020 8:23 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन उघड होत आहे. ड्रग्सच्या विळख्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नाव एनसीबी चौकशीत पुढे येत आहे. सारा अली खान, दीपिका पदुकोण अशा सेलेब्रिंटीजची नावे एनसीबीच्या चौकशीतून पुढे आली आहेत.

दरम्यान कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिची देखील चौकशी व्हावी असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नुकतेच केले आहे.
प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, सिनेसृष्टीत येणारे नवोदित कलाकार ड्रग्सच्या आहारी जात आहेत. कंगना म्हणते म्हणून नव्हे तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढायला हवे. कुणीही त्यांना पाठिशी घालता कामा नये. कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिची देखील चौकशी व्हायला हवी. याबाबत आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ड्रग्सचा विळखा फक्त बॉलिवूड नव्हे तर देशातून संपायला हवा.

कंगना राणौत ड्र्ग्स अ‍ॅडिक्ट असल्याचे म्हणत असल्याच्या कोणता व्हिडीओ असेल तर त्याची पडताळणी करुन चौकशी व्हायला हवी. ती भारताची नागरिक आहे. कायदा सर्वांना समान असायला हवा. याबाबतीत कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment