केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

On: September 23, 2020 11:14 PM

जळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षाचे होते.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

बेळगाव मतदारसंघातून १७ व्या लोकसभेवर भाजपा च्या तिकिटावर ते निवडून गेले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ते रेल्वे राज्यमंत्री होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment