श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी लोकसभा खासदार फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे. काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत. त्यांच्यावर भारताऐवजी चीनने राज्य करावे असे वादग्रस्त विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की काश्मिरी लोकांवर चीनने राज्य करावे अशी त्यांची इच्छा आहे. ते स्वत:ला हिंदुस्थानी अथवा पाकिस्थानी समजत नाहीत. काश्मिरी जनतेचा मोदी सरकारवर विश्वास राहिला नसल्याची मानसिकता झाली आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानात जाणे सोपे होते. त्यांनी गांधींजींच्या भारताची निवड केली होती. मोदींच्या भारताची नव्हे असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
काश्मिरी खोऱ्यातील प्रत्येक गल्लीत एके ४७ असणारे सुरक्षा कर्मचारी दिसतात. त्यामुळे स्वातंत्र्य कुठे आहे? यापूर्वी मंगळवारी फारुक अब्दुल्ला यांनी लोकसभेत बोलतांना म्हटले होते की जम्मू-काश्मीरमध्ये शांततेसाठी कलम ३७० पुन्हा लागू करावे. सरकारने याबाबत फेरविचार करावा असे देखील त्यांनी म्हटले आहे.