चोपडा शहरात वेश्या व्यवसायावर कारवाई

On: October 28, 2026 8:53 AM

जळगाव : चोपडा शहरालगत धनवाडी शिवारातील शेडच्या गोडाऊनमधे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. कुंटणखाना चालवणा-या जगन्नाथ जानकीराम महाजन याच्या विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक युवराज वाळुंज  व कर्मचा-यांनी या कारवाईत सहभाग घेतला. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा कुंटणखाना चालवणा-या जगन्नाथ महाजन यास अटक केल्याने छुप्या मार्गाने वेश्या व्यवसाय चालवणा-यांच्या गोटात खळबळ माजली आहे.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment