व्हायरल ऑडीओ क्लिपची बाब गांभिर्याने घेण्याची गरज नाही : खडसे

On: September 29, 2020 7:13 PM

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे महिनाभरात पक्ष सोडणार असून दुसऱ्या पक्षात कोणते पद मिळते, केवळ याची प्रतिक्षा आहे असा संवाद असलेली एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑडिओ क्लीपमधील संवाद असा आहे.

फोन करणारी व्यक्ती : ‘भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा, योग्य निर्णय घ्या.

नाथाभाऊ : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे आहे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही? महिनाभरात निर्णय घेऊ.

सदर कॉल चुकीचा असून दिवसभरात आपल्याला शेकडो कॉल येत असतात. अशा गोष्टी फारशा गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर विविध आरोप झाले. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना विविध प्रकारचा संघर्ष करावा लागला. तेव्हापासून नाथाभाऊ खडसे हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment