पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणूकीसाठी बरीच रस्सीखेच अखेर सत्ताधारी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष जेडीयू तसेच भाजपमधील जागावाटपाची रितसर घोषणा केली. काही दिवसांपर्यंत एनडीएचा घटक पक्ष लोकजनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.
या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ आणि बिजेपीच्या वाट्याला १२१ जागा मिळाल्या आहेत. जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जतीन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल तसेच जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिजेपी आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पक्षाला देईल.