फेसबुक, ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक जाहीर करावे – रा.कॉ.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी फेसबुक व ट्विटरवर ८० हजार फेक अकाऊंट सुरु करण्यात आली. या कृत्यातून सरकार, मुंबई पोलीस तसेच मंत्र्यांची बदनामी करण्यात आली. याशिवाय बिहारच्या निवडणुकीत राजकीय फायदा लाटण्याच्या उद्देशाने ही अकाऊंट तयार करण्यात आल्याचे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या नामवंत मंडळींच्या अहवालात सांगण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले आहे.

फेसबुक व ट्विटरने या फेक अकाऊंटचे मालक नेमके कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन निर्माण झाली याची माहिती द्यावी, अशी मागणी रा.कॉ.चे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारला व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप देखील तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

एखाद्या प्रकरणाचा न्यायालयीन तपास चालू असताना कोणत्याही प्रकारची मिडीया ट्रायल होवू नये, तसा कायदा केंद्र सरकारने करावा अशी मागणी देखील तपासे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here