वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो आहे – खडसे

On: October 7, 2020 3:27 PM

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथराव खडसे आज मुंबईत आहेत. आज ते शरद पवार यांना भेटणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

याबाबत काही पत्रकारांनी थेट शरद पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की एकनाथ खडसेंबाबत अशा कोणत्याही भेटीचे नियोजन नाही. तसेच त्यांच्या भेटीची विनंती देखील करण्यात आलेली नाही. मी उद्याच्या दिवशी दिल्ली येथे जाणार आहे.

आज एकनाथराव खडसे मुंबईत असले तरी आपण लपून छपून कुणालाही भेटणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कुणाची भेट घ्यायची हे अद्याप निश्चित झालेले नाही. एकनाथराव खडसे यांच्या अशा वक्तव्यामुळे पुन्हा एकवेळ संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या बैठकीत खडसे यांची ऑनलाईन हजेरी होती. या बैठकीत आपण लवकरच मोठी बातमी देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment