नवी दिल्ली : लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान आजारी असल्यामुळे त्यांच्यावर दिल्ली येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.
सध्या केंद्र सरकारच्या ग्राहक, अन्न व नागरी पुरवठा विभागाची धुरा ते सांभाळत होते.रामविलास पासवान यांचा जन्म ५ जुलै १९४६ रोजी बिहार राज्यातील खगरिया या गावी झाला होता. त्यांनी बिहारसह देशाच्या राजकारणात आपल्या कार्याची ओळख दाखवली होती. गेल्या ३२ वर्षांत ११ निवडणुकांपैकी ९ निवडणुकांमधे त्यांनी विजय मिळवला होता.