फडणविसांची एसआयटी चौकशी होणार – ठाकरे सरकारचा निर्णय

uddhav thackeray

मुंबई : दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी च्या माध्यमातून चौकशीचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. तशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे सरकारच्या या निर्णयाबाबत एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना खडसे म्हणाले की जलयुक्त शिवाराबाबत असंख्य तक्रारी शासनाकडे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनेकांनी सांगितले होते. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवाराबाबत गैरव्यवहार असेल, तर चौकशी करा म्हणून सांगितले होते. त्यामुळे आता यामधे काही गैरव्यवहार अथवा भ्र्ष्टाचार असल्यास सत्य बाहेर येईल.

‘कॅग’ने देखील जलयुक्त शिवार योजना अपयशी असल्याबाबतचा ठपका ठेवला होता. त्यामुळे आता राज्य शासनाने ही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या बातम्या सर्वत्र झळकत आहेत. काही आजी व माजी आमदार त्यांच्या समवेत रा.कॉ. पक्षात जाणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. घटस्थापनेच्या दिवशी एकनाथराव खडसे हे रा.कॉ. त जाणार असल्याचा दावा खडसे यांचे कट्टर समर्थक माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here