रा.कॉ. नेत्यासोबत खडसेंचा प्रवास

On: October 17, 2020 7:30 PM

जळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेला उधान आले असतांना आज एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.

रावेर येथील चौघा बालकांच्या हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख आज रावेरला आले. रावेर येथील शासकीय विश्रामगृहात अनिल देशमुख व एकनाथराव खडसे यांची भेट झाली. या भेटीबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथून अनिल देशमुख व एकनाथराव खडसे एकाच वाहनाने घटनास्थळी भेट देण्यास गेले.

जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात चार अल्पवयीन बालकांची हत्या झाली. या परिवारातील सदस्यांची भेट घेण्यासाठी एकनाथराव खडसे व अनिल देशमुख सोबत गेले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment