नवी दिल्ली : पंतप्रधान नरेद्र मोदी आज सायंकाळी सहा वाजता देशवासीयांसोबत एक संवाद साधणार आहेत. आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद मोदी देशवासीयांना काय संदेश देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सायंकाळी सहा वाजता सर्वांनी आवर्जुन टी.व्ही.समोर उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नेमका काय संदेश देणार आहे? काय घोषणा करणार आहे? याबाबत उत्कंठा वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांचा लाईव्ह संदेश म्हणजे कोणतातरी धक्कादायक अथवा दिलासादायक निर्णय जाहिर केला जातो असे म्हटले जाते.
देशातील कोरोनाची आवाक्यात येणारी परिस्थिती तसेच येणारा सण उत्सवाचा काळ या पार्श्वभुमीवर काहीतरी निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे म्हटले जात