खडसे यांच्या बातम्यांमधील प्रश्नचिन्ह (?) हटला – 100% रा.कॉ.त जाणार !

On: October 21, 2020 2:09 PM

जळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपाचे बडे नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या प्रत्येक बातमीत प्रश्नचिन्ह येत होता. तो प्रश्नचिन्ह आता गायब झाला आहे. प्रश्नचिन्हासोबत बातम्यांच्या हेडींगसह बातमीत देखील संदिग्धता व्यक्त केली जात होती.

मात्र बातम्यांमधील तो प्रश्नचिन्ह (?) त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या ताज्या वृत्तानुसार नाहीसा झाला आहे एकनाथराव खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाणार प्रवेश करणार असल्यचे रा.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जाहीर केले आहे.

एकनाथराव खडसे यांनी फोन करुन भाजपचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आम्ही स्वागत करत आहोत असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून भाजपचे नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. खडसे यांच्या इच्छुक समर्थकांना देखील प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment