नवी दिल्ली : मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. न्यायालयाने आज मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही कालावधीसाठी तहकूब केली होती. मात्र चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले होते. सदर सुनावणी आज सकाळी सुरु झाली. त्यावेळी सरकारी वकील अँड.मुकूल रोहतगी उपस्थित नव्हते. त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी काही कालावधीसाठी तहकूब करण्यात आली होती. रोहतगी यांच्या गैरहजेरीबद्दल मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे सरकार याबद्दल गंभीर नसल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.