तरुणीसोबत शरीरसंबंध करणा-या फोटोग्राफरला अटक

जळगाव : तरुणीसोबत झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्याने तिच्यासोबत जवळीक वाढवली. हळू हळू त्याने तिच्यासोबत गोड बोलून प्रेमसंबंध निर्माण केले. या प्रेमजाळ्यात फसल्यानंतर त्या तरुणीने त्याच्यासोबत एके दिवशी फोटो काढले.

त्या फोटोच्या बळावर तरुणाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यासोबत शरीर संबध प्र्स्थापित केले. त्या फोटोचा शस्त्र म्हणून वापर करत ते व्हायरल व पर्यायाने बदनामीचा धाक दाखवून त्या आधारे त्याने तिचा उपभोग घेतला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नरेंद्र ज्ञानदेव सोनवणे (२४), मेस्को माता नगर असे त्या तरुणाचे नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी २१ वर्षाची असून शहरातील एका महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. मार्च २०१९ मध्ये या महाविद्यालयात एका चित्रपटाचे ऑडिशन्स होते. त्यावेळी नरेंद्र सोनवणे हा तरुण त्या ठिकाणी कॅमेरामनच्या भुमिकेत आलेला होता.

या निमीत्ताने त्याची व पिडीत तरुणीची ओळख झाली. हळूहळू त्याने त्या तरुणीसोबत ओळख परिचय वाढवला. दोघे एममेकांच्या संपर्कात राहू लागले. दरम्यानच्या काळात आपल्या प्रेमाचा स्विकार करण्यासाठी त्याने त्या तरुणीला गळ घातली. तिच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचे तो तिला म्हणाला.

तिने नकार दिला तरी तो तिला वारंवार गळ घालून गोड बोलून तिला एका हॉटेल वजा लॉजवर घेवून गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत चर्चे दरम्यान बळजबरी शरीर संबंध प्रस्थापित केले.

वेळोवेळी शरीरसंबंध केल्यानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करु लागला. तसेच काढलेल्या फोटोच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करु लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पिडीत तरुणीने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत नरेंद्र सोनवणे विरोधात बलत्काराची फिर्याद दाखल केली.

पाचोरा पोलीस स्टेशनच्या परिविक्षाधीन महिला पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी पीडितेची फिर्याद घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस कर्मचारी मुकेश पाटील, विजय बाविस्कर यांनी संशयीत नरेंद्र सोनवणे यास अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे सहकरी रतिलाल पवार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here