तरुणाच्या खून प्रकरणी पाचही जणांना जन्मठेप

legal

जळगाव : मद्यपानासाठी पैसे दिले नाही म्हणून जळगाव शहराच्या राजीव गांधी नगरातील एका तरुणाचा सन 2017 मधे खून करण्यात आला होता. या खुन प्रकरणातील पाचही आरोपींना जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. यात तिन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

राहुल प्रल्हाद सकट या तरुणाला त्याच्या कामाचे वेतन मिळालेले होते. त्याच्याजवळ पैसे सत्यासिंग बावरी याला माहीत होते. राहुल जेवण करत असतांना सत्यासिंग मायासिंग बावरी याने त्याच्याजवळ येवून दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र राहुलने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता.

या कारणावरुन दोघात शिवीगाळ झाली होती. रात्री दहा वाजेच्या सुमारास सत्यासिंग बावरी व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई बावरी, पत्नी कालीबाई बावरी यांनी मिळून राहुल यास बेदम मारहाण व शिवीगाळ करत जखमी केले होते. राहुलची आई माळसाबाईने या मारहाणील तिव्र विरोध केला होता. त्यावेळी सत्यासिंग व रवीसिंग या दोघांनी मिळून तिला भिंतीवर ढकलून दिल्याने ती जखमी झाली होती.

दरम्यान सत्यासिंग याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने राहुलच्या पोटात चाकू खुपसून त्याला जखमी केले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला भा.द.वि. १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३०७, ५०४ मुंबई पोलीस अ‍ॅक्ट ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. वैद्यकीय उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खूनाचे कलम वाढवण्यात आले होते.

याप्रकरणी ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. २६ नोव्हेंबर २०१७ पासून या खुन खटल्याची सुरुवात झाली. या खटल्यात १४ साक्षीदारांची तपासणी झाली. त्यात पोलिस उप निरिक्षक राजेश घोळवे यांचा समावेश होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जे. कट्यारे यांनी पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेसह एक हजार रुपयाचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद वेगळी भोगावी लागणार आहे. सर्व आरोपी प्रत्येक कलमात दोषी आढळून आले आहेत.

सरकार पक्षाकडून अॅड.केतन ढाके तसेच आरोपी पक्षाकडून अॅड.हेमंत सूर्यवंशी, अॅड.केदार भुसारी, अॅड. प्रवीण पांडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
या घटनेनंतर मुख्य संशयित सत्यासिंग फरार झाला होता. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उप निरिक्षक राजेश घोळवे यांच्यासह पथकातील प्रदीप चौधरी व शरद पाटील यांनी त्याला अटक केली होती.

सत्यासिंग बावरी याच्यावर रामानंद नगर सह जिल्हापेठ व पारोळा पोलिस स्टेशनला दरोड्याचे ३, पोलिसांवर हल्ला केल्याचा १, चोरी, घरफोडीचे ४, दंगलीचे २ व खूनाचा एक असे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here