नॉनव्हेज हॉटेलमालकाला मनसे सैनिकांनी दिला चोप

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवीन झेंडा एका नॉन व्हेज हॉटेलात वापरल्याचा राग आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकाला चोप देण्यात आला. नवी मुंबईतील या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

तुर्भे येथील हॉटेल बिसमिल्लाहमध्ये सदर घटना घडली आहे. हॉटेल बिसमिल्लाहच्या मालकाने त्याच्या हॉटेलमध्ये मनसेचा राजमुद्रा असलेला नवीन झेंडा लावला होता. हॉटेलच्या एका भिंतीवर आधी लावलेले मेनूचे पोस्टर झाकण्यासाठी त्याने त्यावर राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा लावला होता.

राजमुद्रा असलेला फोटो नॉन व्हेज हॉटेलात का लावला असा प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकाला केला होता. मात्र आपल्याला राजमुद्रा काय आहे हे माहिती नसल्याने आपण हा झेंडा वापरल्याचे हॉटेल मालकाने मनसे सैनिकांना सांगितले.

मात्र मनसे कार्यकर्त्यांनी या हॉटेलचालकाला चांगला चोप दिला. हॉटेलमालकाला उठ बश्या देखील काढायला लावल्या. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवरील मनसेचा तो झेंडा काढून टाकला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे. पुन्हा नव्याने अशा स्वरुपाची चूक होणार नसल्याचे हॉटेल मालकाकडून कबूल करण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here